•पर्यावरणातील वातावरणीय बदलाचे महत्व लक्षात घेता, निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे.
•पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी "माझी वसुंधरा (माय अर्थ)" हा अभिनव उपक्रम विभागाने हाती घेतला आहे. जो निसर्गाच्या "पंचमहाभूते" नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश आहे. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागरूक करून त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रती प्रयत्न करण्यात येतात.
•पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान" राज्यामध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरी स्थानिक संस्था व ग्राम पंचायती या स्थानिक संस्थांची पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या योजना प्रभावीपणे व मिशन मोड पध्दतीने राबविण्याची स्पर्धा घेण्यात येते.
•माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या वर्षात राज्यामधील ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी ( अमृत शहरे ४३ नगरपरिषदा २२२, नगरपंचायती १३० व ग्रामपंचायती २९१) नोंदणी करून हे अभियान दिनांक २ ऑक्टोबर, २०२० ते दिनांक १५ एप्रिल, २०२१ या कालावधीत राबविण्यात आले आहे. या अभियानात निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामांचे मुल्यमापन करण्यासाठी १५०० गुण ठेवण्यात आले होते.
•माझी वसुंधरा अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे मुल्यमापन (डेस्कटॉप मुल्यमापन) दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते ३१ मे, २०२१ या कालावधीत त्रस्त मार्फत करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संबंधित स्थानिक संस्थेमध्ये प्रत्यक्ष जावून मुल्यमापन करणे शक्य नसल्याने या डेस्कटॉप मुल्यमापनामध्ये ज्या स्थानिक संस्था सर्वोत्तम ठरल्या त्या स्थानिक संस्थांचे आभासी मुल्यमापन (Virtual Assessment) विभागांतर्गत गठित समिती मार्फत करण्यात आले. या मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे विजेते घोषीत करून सर्व विजेत्यांसोबत विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी म्हणजे, दिनांक ५ जून, २०२१ रोजी आयोजित माझी वसुंधरा अभियान सन्मान ऑनलाईन सोहळयात सन्मानित करण्यात आले आहे.
•माझी वसुंधरा अभियान २.० ची सुरवात पर्यावरण दिना दिवशी म्हणजे दिनांक ५ जून, २०२१ रोजी करण्यात आली. या अभियानात दुसऱ्या वर्षात नोंदणी करण्यासाठी (१) अमृत, (२) नगर परिषद, (३) नगर पंचायत, (४) ग्राम पंचायत ०१ व (५) ग्राम पंचायत ०२ असे ०५ गट ठेवण्यात आले होते. माझी वसुंधरा अभियान २:० मध्ये ४०६ नागरी स्थानिक संस्था व ११,५६२ ग्राम पंचायतीनी नोंदणी झाली होती.
•माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत स्थानिक संस्थांना काम करण्यासाठी दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते दिनांक ३१ मार्च, २०२२ एवढा कालावधीत देण्यात आला होता. दिनांक १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत स्थानिक संस्थांनी केलेल्या कामाचे डेस्कटॉप असेसमेंट त्रयस्त यंत्रणे मार्फत करण्यात आले. तर, दिनांक १ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत फिल्ड असेसमेंट त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात आले. या मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे राज्यस्तरावरील व विभागस्तरावरील विजेते घोषीत करून सर्व विजेत्यांसोबत विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी म्हणजे, दिनांक ५ जून २०२२ रोजी आयोजित माझी वसुंधरा अभियानसन्मान सोहळयात सन्मानित करण्यात आले आहे.
•माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची मागील दोन वर्षात प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे झालेली फलनिष्पती विचारात घेवून “माझी वसुंधरा अभियान ३.०” ची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याची व माझी वसुंधरा अभियान ३.० ची टूलकीट निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय :
प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबींचा विचार करून पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या सर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान ३.० हे राज्यातील माझी वसुंधरा अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या १६,८२४ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यास शासन मान्यता देत आहे. तसेच, माझी वसुंधरा अभियान ३.० करिता स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहा खालील प्रमाणे गट करून त्यानुसार स्पर्धेची अंमलबजावणी करण्यासही शासन मान्यता देत आहे.
No comments:
Post a Comment