10 November 2022

जागतिक शौचालय दिन, १९ नोव्हेंबर २०२२ साजरा करणे बाबत मार्गदर्शक सूचना

जागतिक शौचालय दिन, १९ नोव्हेंबर २०२२
●संयुक्त राष्ट्र संघाने २०१३ सालापासून जगभर १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले असून भारत सुरुवातीपासून यात सहभागी आहे..
●येत्या १९ नोव्हेंबरला २०२२ सालचा जागतिक शौचालय दिन संपन्न होत असून आपण स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सर्व जिल्ह्यात हा दिन साजरा करणार आहोत
●सध्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्याची अंमलबजावणी सुरु असून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानासाठी राज्यभर ग्रामपंचायती तयारी करीत आहेत.
●वरील दोन्ही अभियांनाना पूरक ठरतील असे निवडक उपक्रम यंदाच्या जागतिक शौचालय दिनाच्या निमित्याने दिनांक ०३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत मोहिमेच्या स्वरूपात आयोजित करण्याचे ठरवले आहे.
●जागतिक शौचालय दिनाच्या निमित्याने आयोजित या राज्यव्यापी मोहिमेत युनिसेफ आणि त्यांच्या सहकारी संस्थाचा देखील सहभाग असणार आहे.

■■जागतिक शौचालय दिन, १९ नोव्हेंबर २०२२ - उपक्रम तपशील■■■

★एक खड्डा शौचालयांसाठी दुसऱ्या खड्ड्याचे बांधकाम
शौचालयांचा एकमेव असणारा खड्डा भरल्यानंतर ही शौचालये वापरण्यायोग्य राहत नाहीत.
ही शौचालये वापरायोग्य करण्यासाठी त्यातील मैलागाळ काढणे अत्यंत कठीण काम ठरते.
अशी शौचालये शाश्वत स्वरुपात वापरायोग्य राहण्यासाठी दुसऱ्या खड्ड्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे..
या पार्श्वभूमीवर, जागतिक शौचालय दिनाच्या निमित्त्याने एक खड्डा शौचालयांचे दोन खड्डा शौचालयात रुपांतर करण्याचा उपक्रम सर्व जिल्ह्यांनी आयोजित करणे अपेक्षित आहे.
एक खड्डा शौचालयांसाठी दुसऱ्या खड्ड्याचे बांधकाम हा उपक्रम सर्व सर्व जिल्ह्यांनी अधिकाधिक ग्रामपंचायत क्षेत्रात राबवावा आणि एक खड्डा शौचालयांना शाश्वत स्वरुपात वापरता येण्यासाठी सुधारणा करून सुरक्षित करावे.


★★पाचशेहून कमी लोकसंख्येच्या गावात मैलागाळ व्यवस्थापनासाठी चर व्यवस्था ग्रामीण भागात बांधल्या गेलेल्या शौचालयांपैकी सेप्टिक टाकीच्या शौचालयांचे प्रमाण लक्षणीय आहे.
ही शौचालये वापरासाठी शाश्वत स्वरुपात उपलब्ध राहण्यासाठी या शौचालयांच्या टाकीतून नियमित स्वरुपात मैलागाळ उपसा करणे आवश्यक आहे..स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार पाचशेहून कमी लोकसंख्येच्या गावात चर तंत्रज्ञान वापरून ही प्रक्रिया करण्याचे सुचवले आहे.
 या पार्श्वभूमीवर, जागतिक शौचालय दिन साजरा करताना पाचशेहून कमी लोकसंख्येच्या जास्तीत जास्त गावात गावात चर तयार करून त्या माध्यमातून मैलागाळ व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.
 या उपक्रमाच्या माध्यमातून पाचशेहून कमी लोकसंख्येचा गावात मैलागाळ व्यवस्थापनाचे काम पूर्ण करता येणार आहे. जागतिक शौचालय दिन निमित्याने राबवावयाच्या मोहिमेच्या दरम्यान जिल्ह्यांनी अधिकाधिक गावात ही व्यवस्था उभी करावी

★★★नागरी मैलागाळ व्यवस्थापन सुविधेसोबत गावांना जोडण्यासाठी नमुना नियोजन आराखडा
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने ग्रामीण भागातील मैलागाळाचे व्यवस्थापन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकडे असलेल्या मैलागाळ व्यवस्थापन सुविधेचा वापर करून करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
आपल्या वार्षिक आराखड्यात मैलागाळ व्यवस्थापनासाठी निवडलेल्या गावांसाठी
आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे.ग्रामीण भागातील मैलागाळ व्यवस्थापनासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी गावांना नागरी सुविधा सोबत जोडणे हा एक महत्वाचा पर्याय आहे.

★★ ग्रामीण नागरी समन्वयातून मैलागाळ व्यवस्थापन करण्याच्या प्रक्रियेचा जिल्ह्यांना अनुभव यावा आणि भविष्यात हे काम शक्य असेल तिथे प्राधान्याने करता यावे म्हणून जागतिक शौचालय दिनाच्या निमित्याने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक नागरी मैलागाळ व्यवस्थापन सुविधेसोबत गावांना जोडण्यासाठी नमुना नियोजन आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.

★★नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत गाव स्तरावर कुटुंब, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळा, अंगणवाडी, वैद्यकीय केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी शौचालय सुविधा उपलब्ध झालेली आहे.
तथापि, अनेक ठिकाणी ही सुविधा नादुरुस्त असल्यामुळे वापरता येत नाही.हागणदारीमुक्त अधिक दर्जा प्राप्त करताना सर्व स्तरावर ही सुविधा वाप स्थितीत उपलब्ध असणे गरजेचे आहे. सर्वच जिल्ह्यात यासंबंधी अधिक काम करण्याची संधी आहे.जागतिक शौचालय दिन साजरा करताना विविध गावामधून वेगवेगळ्या स्तरावर शौचालये 'नादुरुस्त आहेत त्यांची या उपक्रमांतर्गत स्थानिकांच्या आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दुरुस्ती करून ती वापरासाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

★★सार्वजनिक शौचालय बांधकामाबाबत
जिल्हयांतर्गत अस्तित्वात असलेली सार्वजनिक शौचालये वापरायोग्य आहेत किंवा कसे तसेच, सदर शौचालयांतील मैला गाळ व्यवस्थापन योग्य प्रकारे होते किंवा कसे, याचा आढावा घेवून, त्यांना वापरण्यायोग्य स्थितीत आणणे.

★★वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईनद्वारे प्राप्त अर्जांवर कार्यवाही करणे
केंद्र शासनाने, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत, ज्या लाभार्थी कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना ऑनलाईनव्दारे वैयक्तिक शौचालय मागण्यासाठी लिंक उपलब्ध करुन दिली आहे. सदर लिंकवर प्राप्त वैयक्तिक शौचालय मागणी अर्जांची पडताळणी करुन, वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने, कार्यवाही करण्यात यावी.प्रलंबित वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान
जिल्हयांतर्गत पात्र लाभार्थ्यांना द्यावयाच्या प्रलंबित वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदानाबाबत आढावा घेऊन, देय अनुदानतात्काळ अदा करण्यात येईल, यानुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
जागतिक शौचालय दिन आयोजनासंदर्भात जिल्ह्याकडून अपेक्षित कार्यवाही
• सोबत दिलेल्या उपक्रमांच्या दिलेल्या तपशीला संबंधी जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाने बैठकीचे आयोजन करून या उपक्रमांची अंमलबजावणी पद्धती निश्चिती करावी.
• निवड केलेल्या उपक्रमांसाठी ग्रामपंचायतवार कुटुंब, सार्वजनिक, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी उपलब्ध शौचालय सुविधांची सध्यस्थिती लक्षात घेवून उपक्रमांसाठी तालुकावार ग्रामपंचायतीची यादी निश्चित करावी.
• निवड केलेल्या ग्रामपंचायतींची यादी उपक्रम तपशिलासह पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना पाठवून सहभागासाठी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
• जागतिक शौचालय दिनाचे जिल्हा नियोजन पूर्ण झाल्यावर ते विविध समाज माध्यमे आणि
वृत्तपत्रांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करावा.
जागतिक शौचालय दिन निमित्य सुचवलेल्या उपक्रमांच्या संबंधी सविस्तर तांत्रिक टिपण उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
जागतिक शौचालय दिन आयोजनासंदर्भात जिल्ह्याकडून अपेक्षित कार्यवाही
जागतिक शौचालय दिन २०२२ च्या निमित्त्याने गावपातळीवर आयोजित उपक्रमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होण्यासाठी तालुका आणि ग्रामपंचायतवार जबाबदारीचे वाटप करावे.
• जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, शासकीय विभागांच्या सक्रीय सहभागासाठी त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे जागतिक शौचालय दिनाचे जिल्हा नियोजन पाठवावे आणि त्यांच्या सहभागाची निश्चिती करून घ्यावी.
दिनांक ० ३ ते १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान जिल्हा कक्षाने शक्यतेनुसार ग्रामपंचायतींना भेटी देवून उपक्रम सहभागासाठी प्रोत्साहित करावे.
 

No comments:

Post a Comment